Woman Molestation: महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या शेजाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – अश्लिल मॅसेज करत महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या शेजाऱ्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजिंक्य अनिल नहार (वय 39 रा.निगडी) याच्यावर शुक्रवारी (दि.18) निगडी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मदत म्हणून अनोळखी माणसाला आपला फोन देत असाल तर सावधान

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या शोजारी आरोपी राहतो. तो फिर्यादी यांना ईमेल, व्हॉटसअप मॅसेजवरून अश्लिल मजकूर पाठवणे, तसेच फिर्यादीचा हात पकडून त्यांच्या मनास लज्जा उत्पन्न केल्या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचा पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.