Talegaon Dabhade : महिलेशी गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक

एमपीसी न्यूज – रिक्षेची धडक बसल्यानंतर रिक्षा चालकाला जाब विचारला असता  महिलेला शिवीगाळ करून गैरवर्तन करणाऱ्या रिक्षा चालकाला (Talegaon Dabhade) तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी (दि.10) तळेगाव वडगाव रोडवर घडली आहे.

याप्रकरणी महिलेने तळेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे.

Pune News : महाराष्ट्र ऑलम्पिक कयाकिंग स्पर्धेत पुण्याच्या संघाला सुवर्ण पदक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या दुचाकी वरून जात असताना शिवाजी चौकाच्या बाजूने आरोपी रिक्षा चालक त्याची रिक्षा भरधाव वेगात घेऊन आला. (Talegaon Dabhade) त्यामुळे फिर्यादीच्या दुचाकीला धकड बसली. यावेळी फिर्यादी दुचाकीच्या नुकसानाबद्दल रिक्षा चालकाला विचारायला गेले असता आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच फिर्यादी यांच्या अंगावर धावून जाऊन शिवीगाळ करत फिर्दीच्या मनात लज्जा उत्पन्न केली यावरून तळेगाव दाभाडे पोलीसांनी रिक्षा चालकाला अटक केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.