Chakan : बेकायदेशीर वाळू वाहतूक करणा-या ट्रक चालकावर गुन्हा

एमपीसी न्यूज – बेकायदेशीर वाळू वाहतूक करणा-या ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच 5 लाख रुपये किमतीचा ट्रक आणि 21 हजारांची तीन ब्रास वाळू पोलिसांनी जप्त केली आहे. म्हाळुंगे पोलिसांनी ही कारवाई केली.

किशोर विठ्ठल सोनावणे (वय 33, रा. शरदवाडी, ता. शिरुर), असे गुन्हा दाखल झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस शिपाई श्रीधन बाळासाहेब इचके यांनी म्हाळुंगे चौकीत फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 21) दुपारी साडेपाचच्या सुमारास एम एच 12 / एफ झेड 9412 हा ट्रक कुरुळी गावच्या हद्दीत चाकणकडून मोशीकडे जात होता. त्यामध्ये बेकादेशीर वाळू वाहून नेली जात होती. पोलिसांनी या ट्रकवर कारवाई करत वाळूसह ट्रक जप्त केला आहे. म्हाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.