Chikhali : रस्त्याने पायी जाणा-या महिलेची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असलेल्या महिलेची 25 हजार रुपयांची सोन्याची साखळी अनोळखी तीन जणांनी हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 20) रात्री साडेआठच्या सुमारास शिवाजीनगर, चिखली येथे घडली.

विशाल दिलीप चव्हाण (वय 37, रा. अजिंक्यतारा कॉलनी, चिखली) यांनी याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनोळखी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विशाल यांची बहीण धनश्री दिलीप चव्हाण (वय 32) शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास मीठ आणण्यासाठी घराजवळील दुकानात पायी चालत जात होत्या. त्या शिवाजीनगर येथील अजिंक्यतारा सोसायटीच्या बाहेर आल्या असता अंधारात मोटारसायकलवर लपून बसलेल्या तीन अनोळखी चोरट्यांनी हिसका मारून त्यांच्या गळ्यातील 25 हजार रुपयांची सोन्याची साखळी चोरून नेली. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.