Nigdi : पीएफच्या रकमेत अफरातफर केल्या प्रकरणी कंपनी संचालकांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी (पीएफ) च्या रकमेत अफारतफर केल्याच्या कारणावरुन भविष्य निधी संघटन यांच्याकडून एनव्हायरो बल्क हॅडलींग सिस्टीम प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या चार संचालकांविरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भविष्य निर्वाह निधीचे निरीक्षक अजय जगन्नाथ गणवीर (वय 47, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कंपनीचे मालक मिलींद मधुकर दिक्षीत, प्रशांत मधुकर पप्पल, सुजित गोपाल कुलकर्णी, नितीन पुरोषत्तम सुपे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वरील सर्व आरोपी हे एनव्हायरो बल्क हॅडलींग सिस्टीम प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत. फिर्यादी हे तेथे निरीक्षणासाठी गेले असता संबंधीत कंपनीतर्फे कर्मचाऱ्यांचा एप्रिल 2015 ते ऑगस्ट 2018 असा तब्बल तीन वर्षाचा 17 लाख 61 हजार 191 रुपयांचा पीएफ संचालक मंडळातर्फे भविष्य निधीच्या क्षेत्रीय कार्यालयात भरलाच नाही. त्यामुळे त्यांच्यावर कर्मचाऱ्यांची आर्थिक फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.