Pune : पुणे-लोणावळा लोकलला महिलांचा चौथा डबा

एमपीसी न्यूज – पुणे-लोणावळा (उपनगरीय) लोकल रेल्वेला आणखी एक महिलांचा डबा निर्धारित करण्यात आला आहे. यामुळे महिलांच्या सुरक्षेत आणि आरामदायी प्रवासात भर पडणार आहे. ही सेवा गुरुवार (दि. 1) पासून सुरु करण्यात येणार आहे.

पुणे-लोणावळा लोकल गाडीला एकूण 12 कोच आहेत. त्यातील तीन कोच महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. या तीन कोचमध्ये 234 सीट उपलब्ध आहेत. तरीही या कोच मध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. त्यामुळे महिलांची सुरक्षा आणि आरामदायी प्रवासासाठी आणखी एक कोच देण्याची मागणी महिला प्रवाशांमधून करण्यात येत होती. त्यानुसार पुणे रेल्वे विभागाने या लोकल गाडीमधील आणखी एक कोच महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला.

नवीन चौथ्या कोचमध्ये 62 सीटची क्षमता आहे. नवीन कोच निर्धारित करण्यात आल्यामुळे अन्य तीन कोचवर येणारा ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. ही सेवा गुरुवार (दि. 1) पासून प्रायोगिक तत्वावर एक महिन्यासाठी सुरु करण्यात येणार आहे. या सेवेमुळे महिला प्रवाशांच्या अडचणी निश्चित कमी होतील. या चौथ्या कोचसाठी आवश्यक मार्किंग करण्यात आली आहे. महिला प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पुणे रेल्वे विभागाकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.