Cyber Attack on Air India: एअर इंडियाचा सर्व्हर हॅक, प्रवाशांची माहिती लीक

एमपीसी न्यूज : एयर इंडियाच्या प्रवाशांचा डेटा लीक झाल्याची माहिती समोर आली आहे. एअर इंडियाच्या डेटा सेंटरवर सायबर हल्ला झाला असून यात जवळपास 45 लाख प्रवाशांचा डेटा गहाळ झाला आहे.

भारतासह इतर देशातील प्रवाशांचाही यात समावेश आहे. अनेक प्रवाशांच्या क्रेडिट कार्डची माहितीही चोरीला गेली आहे. एअर इंडियाने आपल्या अधिकृत वेबसाईटवरुन यासंदर्भात माहिती दिली आहे. सकाळने ही बातमी दिली आहे.

26 ऑगस्ट 2011 ते 20 फेब्रुवारी 2021 पर्यंतचा डेटा चोरीला गेल्याचं कंपनीने म्हटले आहे. या सायबर हल्ल्यामध्ये प्रवाशांची नावे, जन्मतारीख, मोबाईल नंबर, पासपोर्ट डिटेल्स यासह क्रेडिट कार्डसंदर्भातील माहितीही गहाळ झाली आहे.

सीवीवी/सीवीसी नंबर डेटा प्रोसेसचा भाग नव्हता. त्यामुळे प्रवाशांनी चिंता करण्याचे कोणतेही कारण नाही. खबरदारीसाठी ग्राहकांनी आपापल्या क्रेडिट कार्डचा पासवर्ड बदलावा, असे आवाहनही कंपनीकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.