Dagdusheth Halwai Ganpati : दगडूशेठ’ बाप्पांसमोर 31 हजार महिलांनी केले सामूहिक अथर्वशीर्षाचे पठण

एमपीसी न्यूज – ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि… असे अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर, महिलांनी (Dagdusheth Halwai Ganpati)  केलेला शंखनाद आणि मोरया मोरया च्या जयघोषाने मंत्रमुग्ध झालेल्या वातावरणात 31 हजार महिलांनी सामुदायिकरित्या अथर्वशीर्षाचे पठण केले. ऋषिपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर झालेल्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय आले होते.

Today’s Horoscope 20 September 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे ऋषिपंचमीनिमित्त पहाटे 31 हजार महिलांनी उत्सव मंडपासमोर अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा (Dagdusheth Halwai Ganpati)  जयघोष करीत महिलांनी पहाटेच्या मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.

पुण्याचे सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे विश्वस्त व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. रशिया येथून आलेल्या परदेशी भक्तांनी देखील यावेळी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते.

महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले. तसेच हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत महिलांनी गणरायाला अभिवादन केले.

पारंपरिक पेहरावातील महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकापर्यंतचा परिसर महिलांच्या शिस्तबद्ध रांगेने भरून गेला होता.

विविध देशांतील परदेशी पर्यटकांची पठणाकरीता उपस्थिती

पुण्याचा गणेशोत्सव आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ख्याती केवळ भारतातच नाही, तर संपूर्ण जगात आहे. त्यामुळे दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच अथर्वशीर्ष पठणाच्या सोहळ्याला फ्रान्स, इस्त्राईल, इटली, मॅस्कीको, पोलंड, तुर्कीसह विविध देशातील 30 हून अधिक परदेशी पर्यटकांनी पठणाकरीता हजेरी लावली. यावेळी सहभाग घेत पाहुण्यांनी गणपतीचे दर्शन घेण्यासोबतच हा सोहळा आपल्या कॅमे-यामध्ये (Dagdusheth Halwai Ganpati)  टिपला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.