Dapodi : भोसरी पोलिसांनी पकडला नऊ किलो गांजा; एका तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्रीसाठी आलेल्या एका तरुणाला (Dapodi) अटक करत त्याच्याकडून भोसरी पोलिसांनी नऊ किलो 622 ग्रॅम वजनाचा गांजा, एक लाखाची देशी दारू असा ऐवज जप्त केला आहे. ही कारवाई सोमवारी (दि. 3) दुपारी साडेतीन वाजता एस टी रोड, दापोडी येथे करण्यात आली.

ओमकार महादेव लिंगे (वय 25, रा. एसटी रोड, दापोडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुकेश मोहारे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एसटी रोड, दापोडी येथे राहणारा तरुण गांजा विकत असल्याची माहिती भोसरी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ओमकार लिंगे याच्या घरावर छापा मारून कारवाई केली.

Pimpri News – “शिक्षकांचा अनादर समाजाला अधोगतीकडे नेतो” – डॉ. पंडित विद्यासागर

त्यात (Dapodi) पोलिसांनी एक लाख 44 हजार 500 रुपये किमतीचा नऊ किलो 622 ग्रॅम गांजा, एक लाख सहा हजार 31 रुपयांची देशी दारू आणि एक लाख रुपये किमतीचा आयफोन असा तीन लाख 50 हजार 531 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.