Rahatani : मारहाण करून हिसकवला तरुणाचा मोबाईल; चोरट्यास अटक

एमपीसी न्यूज – मारहाण करून महागडा मोबाइल (Rahatani) चोरणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सायंकाळी रहाटणी येथे घडली.

ऋषिकेश ज्योतीराम गरड (वय 24, रा. नखाते वस्ती, रहाटणी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ओंकार बन्सी माने (वय 24, रा. नखाते वस्ती, रहाटणी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dapodi : भोसरी पोलिसांनी पकडला नऊ किलो गांजा; एका तरुणाला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी (Rahatani) पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी माने हे शिवराज नगरकडे जाणाऱ्या रस्त्याने चालले होते. त्यावेळी तेथे आलेल्या आरोपी गरड याने फिर्यादी माने यांना हाताने मारहाण करून त्यांचा 50 हजार रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने चोरून नेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.