Pune News – दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन, कीर्तन महोत्सव

एमपीसी न्यूज – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे चातुर्मासानिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचन व कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

Rahatani : मारहाण करून हिसकवला तरुणाचा मोबाईल; चोरट्यास अटक

यामध्ये संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, ह.भ.प.अभय टिळक, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्तबुवा आफळे, योगिराज महाराज गोसावी – पैठणकर यांसह महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार सहभागी होणार आहेत. दिनांक 6 ते 19 जुलै दरम्यान स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच  (Pune News) येथे दररोज सायंकाळी 5.30 नंतर हे कार्यक्रम होणार असून सर्वांसाठी विनामूल्य खुले आहेत, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

चातुर्मासानिमित्ताने दिनांक 6 ते 12 जुलै रोजी दररोज सायंकाळी 6.30 वाजता प्रवचन होणार आहेत. त्यामध्ये अनुक्रमे धाराशिव येथील संत गोरोबाकाका मंदिराचे ह.भ.प.पद्मनाभ महाराज व्यास, संतसाहित्याचे अभ्यासक डॉ.सदानंद मोरे, सुतारवाडी चे ह.भ.प. राजेंद्र महाराज दहिभाते, श्री क्षेत्र भंडारा डोंगर येथील भाषाप्रभू ह.भ.प.डॉ.पंकज महाराज गावडे, पुण्याचे ह.भ.प. अभय महाराज टिळक, मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर यांचे प्रवचन असणार आहे.

दिनांक 13 ते 19 जुलै दरम्यान दररोज सायंकाळी 5.30 ते 8 यावेळेत चातुर्मास कीर्तनांतर्गत महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकार कीर्तन सादर करणार आहेत. त्यामध्ये गुरुवारपासून (दि. 13 जुलै) अनुक्रमे मुंबईचे ह.भ.प.चिन्मय महाराज सातारकर, ह.भ.प.भगवतीताई सातारकर, पंढरपूर येथील संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज नामदास, आळंदीतील जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली शिंदे, राष्ट्रीय कीर्तनकार डॉ.चारुदत्तबुवा आफळे, नागपूर येथील ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, पैठण येथील संत एकनाथ महाराज यांचे वंशज ह.भ.प.योगिराज महाराज गोसावी – पैठणकर हे कीर्तन करणार आहेत.

बुधवार पेठेतील दगडूशेठ गणपती मंदिरात सभामंडपामध्ये चातुर्मास निमित्त अतिरुद्र महायज्ञाचे आयोजन दिनांक 5 ते 15 जुलै दरम्यान दुपारी 1 ते सायंकाळी 7 यावेळेत करण्यात आले आहे. यामध्ये विविध प्रकारचे याग, पूजा, होम होणार आहेत.

अतिरुद्र महायज्ञामध्ये वेदमूर्ती नटराज शास्त्री यांच्या नेतृत्वाखाली 125 ब्रह्मवृंद पौरोहित्य करणार आहेत. तरी भविकांनी पुणेकरांनी प्रवचन, कीर्तन महोत्सव व अतिरुद्र महायज्ञामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.