Nigdi : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने पावणे आठ लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – प्रीपेड टास्क देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची सात लाख 72 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली. ही घटना 14 ते 27 मार्च या कालावधीत निगडी येथे घडली.

 Pune News – दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे चातुर्मासानिमित्त प्रवचन, कीर्तन महोत्सव

निगडी येथील 38 वर्षीय व्यक्तीने याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 9011009286 मोबाईल क्रमांक धारक,  9953185519 मोबाईल क्रमांक धारक नितीन (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), संदीप (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही), राहुलकुमार वर्मा (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी आपसात संगनमत करून फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून त्यांना प्रीपेड टास्कचे काम दिले. त्यातून त्यांना भरपूर पैसे मिळतील असे आमिष दाखवण्यात आले.

 

प्रीपेड टास्क असल्याने अगोदर पैसे भरावे लागतील असे सांगून फिर्यादीकडून सात लाख 72 हजार 937 रुपये घेत त्यांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.