Nigdi : शस्त्रासह परिसरात निर्माण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा; एकास अटक

एमपीसी न्यूज – कोयता आणि काठ्या हवेत फिरवत मोठमोठ्याने (Nigdi )आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केल्याप्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 9) रात्री ओटास्कीम निगडी येथे घडली. एका आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

अजय रामू चौधरी (वय 21, रा. रुपीनगर तळवडे) असे अटक(Nigdi) केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह रितेश सोनवणे आणि एका अनोळखी व्यक्तीच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिली आहे.

Pimpri Chinchwad RTO : जप्त केलेली वाहने सोडवून घ्या अन्यथा लिलाव

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच शिवीगाळ करून फिर्यादी यांच्या घराचे नुकसान केले. हातात कोयता आणि काठ्या घेऊन हवेत फिरवत मोठमोठ्याने आरडाओरडा करत परिसरात दहशत निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.