Chakan : चाकण परिसरात तीन दिवसाला एक वाहन चोरी

चोरट्यांना पकडण्याचे प्रमाण नगण्य

एमपीसी न्यूज – चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दर तीन दिवसाला (Chakan)एक वाहन चोरीला जाण्याचा प्रकार उघडकीस येत आहे. वर्षाकाठी शेकडो वाहने चोरीला जात असून त्यातील बोटावर मोजता येतील एवढीच वाहने पोलिसांना सापडत आहेत. वाहन चोरट्यांना पकडण्याचे प्रमाण अतिशय नगण्य आहे.

घरासमोर, दुकानासमोर, रस्त्याच्या बाजूला, सार्वजनिक ठिकाणी पार्क केलेली (Chakan)वाहने चोरीला जात आहेत. सर्वत्र सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असले तरी या वाहन चोरट्यांचा माग काढणे चाकण पोलिसांना शक्य होत नाही. त्यामुळे भर दिवसा देखील वाहने चोरी करण्यापर्यंत चोरट्यांची हिम्मत वाढली आहे.

यापूर्वी चाकण परिसरातून एटीएम ओढून चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच मोबाईल फोन, दुचाकीसह अवजड वाहने देखील चोरून नेली आहेत. चाकण परिसरात असलेल्या कंपन्यांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहेत. गोडाऊन मधून लाखो रुपयांचा माल चोरटे लंपास करीत आहेत. कामगारांना लुटणे, मोबाईल फोन हिसकावणे, घरफोड्या यांची आकडेवारी वेगळीच आहे.

Pimpri Chinchwad RTO : जप्त केलेली वाहने सोडवून घ्या अन्यथा लिलाव

गुन्हे शाखा मदतीस असून देखील या चोरट्यांना पकडण्यात पोलीस अपयशी ठरत आहेत. वर्षाकाठी चोरीचे अवघे काहीच गुन्हे उघडकीस येतात. वर्षभरात दाखल होणारे शेकडो वाहन चोरी आणि अन्य चोरींचे गुन्हे वर्षानुवर्षे पेंडिंग राहतात.

दहा दिवसात चोरीच्या चार घटना
दिब्यरंजन सनातन बिस्वाल यांची दुचाकी (एमएच 14/जेक्यू 5347) त्यांच्या घरासमोरून 7 जानेवारी रोजी मध्यरात्री चोरीला गेली. प्रकाश लक्ष्मण ठाकरे यांची दुचाकी (एमएच 37/पी 5944) आणि ओगडराम दोलाजी चौधरी यांची दुचाकी (एमएच 12/जेएस 9458) नाणेकरवाडी येथून 5 जानेवारी रोजी चोरीला गेली. तसेच प्रकाश सखाराम जाधव हे 5 जानेवारी रोजी चाकण येथील बाजारपेठेत भाजी खरेदीसाठी गेले असता चोरट्यांनी त्यांचा मोबाईल फोन चोरून नेला. मेदनकरवाडी येथे उघड्या दरवाजावाटे दागिने चोरीला गेल्याचा गुन्हा 5 जानेवारी रोजी दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे उघडकीस येण्याचे प्रमाण अत्यल्प
चाकण पोलिसांनी नुकतीच एका वाहन चोरट्याला अटक केली. त्याच्याकडून 12 दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत. त्यात चाकण पोलीस ठाण्यातील अवघे सात गुन्हे उघडकीस आले आहेत. अशोक मधुकर सोनवणे (रा. राळेगण थेरपाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.