Pune : आम्ही शरद पवार साहेबांसोबत असे प्रतिज्ञापत्र प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून लिहून घेणार : शहराध्यक्ष प्रशांत जगताप

पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत तीन ठराव

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार हे शिंदे फडणवीस यांच्या सोबत जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ दोन दिवसापूर्वी घेतली. त्या घटनेनंतर अनेक राजकीय घडामोडी घडत असून शरद पवार की अजित पवार यांच्या सोबत जायच अशा संभ्रम अवस्थेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत.

Nigdi : प्रीपेड टास्कच्या बहाण्याने पावणे आठ लाखांची फसवणूक

त्याच दरम्यान उद्या शरद पवार आणि अजित पवार यांनी बैठकीच आयोजन केले आहे.त्या पार्श्वभूमीवर आपण आता नेमक कोणासोबत जायच, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक भागात राष्ट्रवादी काँग्रेस मधील पदाधिकाऱ्यांच्या बैठका होत आहे. पुणे (Pune) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या नेतृत्त्वाखाली कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीला खासदार वंदना चव्हाण,प्रवक्ते अंकुश काकडे यांच्या सह आजी माजी पदाधिकाऱ्यांची बैठक झाली.

त्या बैठकीनंतर प्रशांत जगताप यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला असता ते म्हणाले की, पुणे जिल्हय़ातील नागरिक शरद पवार यांच्या पाठीशी कायम राहिला असून आज देखील त्यांच्या पाठीशी आहे. सध्याची राजकीय घडामोड लक्षात घेऊन आजच्या बैठकीत तीन ठराव करण्यात आले आहे.शरद पवार यांच्या पाठीशी जिल्हय़ातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते सोबत राहणार आहे.

मुंबईत उद्या होणाऱ्या बैठकीला शहरातील 300 ते 350 कार्यकर्ते जाणार आहेत.तसेच भविष्यात कायदेशीर लढा उभा राहण्याची शक्यता आहे.त्या पार्श्वभूमीव आम्ही शरद पवार साहेबांसोबत असे प्रतिज्ञापत्र प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून लिहून घेतले जाणार आहे. हे तीन ठराव आजच्या बैठकीमध्ये करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार चेतन तुपे आणि आमदार सुनील टिंगरे यांना निरोप देण्यात आला होता : प्रशांत जगताप

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार चेतन तुपे आणि वडगावशेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे या दोन्ही विद्यमान आमदारांना आजच्या कार्यकारिणी बैठकी बाबत निरोप देण्यात आला होता. उद्या मुंबईत होणार शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या बैठकीला पवार साहेबांच्या प्रेमापोटी निश्चित येतील अशी अपेक्षा यावेळी प्रशांत जगताप यांनी व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.