Dapodi : दारू पिताना मित्रांसोबत झालेल्या भांडणात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : – मित्रांसोबत दारू पीत असताना झालेल्या भांडणात तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि. 24) रात्री दापोडी येथे घडली.

सचिन भिमराव भिंगारे (वय 27, रा. दापोडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन त्याच्या दोन मित्रांसोबत सोमवारी रात्री दारू पीत बसला होता. दारू पीत असताना मित्रांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. यामध्ये दोन मित्रांनी सचिन याला मारहाण केली. यामध्ये सचिन चक्कर येऊन जागेवर कोसळला.

सचिनच्या वडिलांनी त्याला पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सचिनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share