Dapodi : पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खून

एमपीसी न्यूज – पूर्वी झालेल्या भांडणाच्या कारणावरून एका तरुणावर कोयत्याने वार करून त्याची हत्या करण्यात आली आहे . याशिवाय इतर दोघेजण जखमी झाले. ही घटना रविवारी पहाटे दोनच्या सुमारास दापोडी येथे घडली.

अल्विन रवी राजगोपाल (वय 19 , रा. कैलास जाधव चाळ, जयभीमनगर, दापोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. क्लेरा रॉबर्ट किट्टो यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अभिषेक राजू चव्हाण (वय 26), रुपेश दिलीप संकपाळ (वय 20), राहुल वीर उर्फ पप्प्या (वय 20), निखील (पूर्ण नाव माहित नाही) सनी गजभीव (वय 20, सर्व रा. जयभीमनगर, दापोडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्विन रवी राजगोपाल यांचे मागील काही दिवसांपूर्वी आरोपींसोबत भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी आपसात संगनमत करून रविवारी पहाटे दोन वाजताच्या सुमारास अल्विन रवी राजगोपाल यांच्यावर कोयत्याने डोक्यात वार केले. तसेच पेव्हिंग ब्लॉक आणि दगडाने मारहाण करत त्यांचा खून केला. तसेच हे भांडण सोडविण्यासाठी आलेल्या क्लेरा रॉबर्ट किट्टो आणि पुष्पा राजगोपाल यांनाही आरोपींनी मारहाण करून जखमी केले. यावरून गुन्हा नोंदवण्यात आला असून भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.