New Delhi : पोस्टल आणि ग्रामीण पोस्टल जीवन विमा पॉलिसीचा हप्ता भरण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ

एमपीसी न्यूज – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता  केंद्र सरकारकडून  पोस्टल जीवन विमा आणि ग्रामीण पोस्टल जीवन विमा पॉलिसीचा मार्च महिन्यातील हप्ता भरण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल पर्यंत पुढे ढकलली आहे. तसेच यासाठी कोणत्याही प्रकारचे विलंब शुल्क आकारले जाणार नाही. 

अत्यावश्यक सेवा अंतर्गत पोस्टाची सेवा सुरू असली तरी हप्ते भरण्यासाठी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील लोकांना अडचण निर्माण होत आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे 13 लाख पॉलिसी धारकांना याचा फायदा होणार आहे

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.