Nigdi : पतसंस्थेत नोकरी लावण्याच्या आमिषाने तरुणाची फसवणूक

एमपीसी न्यूज – पतसंस्थेत नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणाकडून पैसे घेतले. पैसे घेऊन तरुणाला नोकरी न लावता त्याची फसवणूक केली. ही घटना निगडी येथे घडली.

महेश गौतम शिंदे (वय 24, रा. दामू अण्णा लांडगे चाळ, धर्मवीर संभाजी बँकेच्या मागे, कासारवाडी) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष चव्हाण (रा. चिंतामणी चौक, वाल्हेकरवाडी, चिंचवड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक महिन्यापूर्वी ते 3 सप्टेंबर 2019 या दरम्यान आरोपी संतोष चव्हाण याने फिर्यादी महेश यांच्याकडून पतसंस्थेत नोकरी लावतो, असे आमिष दाखवून पाच हजार रुपये घेतले. मात्र नोकरी लावली नाही. तसेच महेश याने पैसे परत मागितले असता त्यास जीवे ठार मारील, अशी धमकी दिली. याबाबत महेश यांनी पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.