Dehu road theft : प्रवासात महिलेची सोन्याची बांगडी पळवली

एमपीसी न्यूज – देहूगाव ते देहूरोड या मार्गावर पीएमपीएमएल बसने प्रवास करत असताना प्रवासी महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरीला गेली.(Dehu road theft) ही घटना शुक्रवारी (दि. 28) सायंकाळी घडली.

याप्रकरणी 59 वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Terrace Garden : ‘माती विरहित टेरेस गार्डन’ चे उदघाट्न 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला आणि त्यांची मैत्रीण अशा दोघीजणी गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास देहूगाव ते देहूरोड (Dehu road theft) या मार्गावरून पीएमपीएमएल बसने प्रवास करीत होत्या. बस प्रवासात अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांच्या हातातील 86 हजार रुपये किमतीची 23.310 ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी हातचलाखीने चोरून नेली. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.