Dehuroad : कोरोना ; मंगलकार्यालयाऐवजी राहत्या घरी होणार लग्नसमारंभ

 एमपीसी न्यूज : ‘कोरोना’च्या भीतीने सरकारी व खासगी स्वरूपाचे अनेक पुर्वनियोजित कार्यक्रम रद्द केले जात आहेत. यामध्ये लग्नसमारंभाचाही समावेश होऊ लागला आहे. थेरगाव आणि मामुर्डी येथील कुटुंबियाच्या मुलामुलीचा रावेत येथील मंगलकार्यालयात बुधवारी ( दि. १८) आयोजित केलेला विवाहसोहळा कोरोनामुळे आता राहत्या घरी व तोही साधेपणाने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

हा विवाहसोहळा बुधवारी (दि. १८) रावेत येथील भोंडवे लॉन्स येथे होणार होता. तथापि, सध्या कोरोना विषाणूचा होणारा फैलाव पाहता हा विवाह राहत्या घरी करण्याचा निर्णय दोन्ही कुटुंबीयांनी घेतला आहे. तसेच हा लग्न सोहळा कोणताही डामडौल न करता सध्या पद्धतीने करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी निवडक नातेवाईक मंडळी उपस्थित राहणार असल्याचे या दोन्ही कुटुंबीयांनी सांगितले.

दरम्यान, कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी या कुटुंबीयांनी मंगल कार्यालयातील लग्न सोहळा रद्द करून तो राहत्या घरी करायचा निर्णय घेतल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. तसेच सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी टाळण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाचे समाजाच्या सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.