Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये 21 नवे रुग्ण; 26 जणांना डिस्चार्ज,142 सक्रिय रुग्ण

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज मंगळवारी (दि.6) 21 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1725 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली. 

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी सात वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1725 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  कोरोना उपचारातून बरे झालेल्या 26 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. हद्दीत सध्या 142 सक्रिय रुग्ण आहेत.

आज मिळालेल्या आकडेवारीनुसार बरलोटा नगर आणि गुलमोहोर सोसायटी येथे प्रत्येकी 3, इंद्रप्रस्थ सोसायटी आणि रानडे चाळ येथे प्रत्येकी २, तसेच शिवाजीनगर, पोर्टर चाळ, किन्हई, झेंडेमळा, थॉमस कॉलनी, मेन बाजार, इंद्रायणी दर्शन, एल्लोरा सोसायटी येथे प्रत्येकी एक, अशा एकूण 21 नव्या रुग्णांची नोंद झाली.

सध्या 22 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आतापर्यंत एकूण 1547 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 73 रुग्ण असून हद्दीत एकूण 147 सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या 44 रुग्ण दाखल आहेत. पीसीएमसी कोविड सेंटर येथे 3 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.