Dehuroad Corona Update : देहूरोडमध्ये 22 नव्या रुग्णांची भर; थॉमस कॉलनीत सर्वाधिक 6 पॉझिटिव्ह

23 जणांना डिस्चार्ज

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज शनिवारी (दि. 3) 22 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे हद्दीतील आतापर्यंतच्या एकूण बाधित रुग्णांची रुग्णांची संख्या 1670 इतकी झाली असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.  

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, रात्री 8 वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1670 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.  कोरोना उपचारातून बरे झालेल्या 23 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज मिळालेल्या आकडेवारीनुसार चिंचोली , एल्लोरा सोसायटी, सर्वत्र नगर, इंद्रायणी दर्शन, किन्हई, आंबेडकर नगर, मेन बाजार, प्रियदर्शनी सोसायटी येथे प्रत्येकी 1, शितळा नगर नं. 1 आणि बरलोटा नगर येथे प्रत्येकी 2, तर थॉमस कॉलनी येथे 6 तसेच संकल्प नगरी येथे 4 अशा एकूण २२ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

सध्या 12 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.आतापर्यंत एकूण 1487 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. होम आयसोलेशनमध्ये 79 रुग्ण असून हद्दीत एकूण 147 सक्रिय रुग्ण आहेत.

सीजिएच कोविड सेंटरमध्ये सध्या 56 रुग्ण दाखल आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.