Maharashtra Corona Update : चिंता वाढली ! आज राज्यात जवळपास 50 हजार नवे कोरोना रुग्ण

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोना रुग्णांचा वाढता आलेख दिवसेंदिवस उंचावत आहे. आज दिवसभरात झालेली कोरोना रुग्णांची वाढ चिंता वाढवणारी असून, आज राज्यात तब्बल 49 हजार 447 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. राज्यातील ही आजवरची सर्वाधिक रुग्ण वाढ आहे.

मुंबईत आज 9 हजार 090 रुग्णांची नोंद झाली तर, पुण्यात 5 हजार 720 नव्या रुग्णांची वाढ झाली.

आरोग्य विभागाच्या हावाल्याने एएनआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 29 लाख 53 हजार 523 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 24 लाख 95 हजार 315 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत.

आज 37 हजार 821 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 84.49 टक्के एवढं झाले आहे.

राज्यात सध्या राज्यात 4 लाख 01 हजार 172 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यात आज 277 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, आजवर एकूण 55 हजार 656 जण कोरोनामुक्त मुत्यूमुखी पडले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.88 टक्के एवढा आहे.

सध्या राज्यात 21 लाख 57 हजार 135 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 18 हजार 994 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आतापर्यंत 2 कोटी 03 लाख 43 हजार 123 नमूने तपासण्यात आले आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा केली. राज्यातील कोरोना परिस्थिती बाबत सुचना मागवल्या.

मुख्यमंत्री म्हणाले, आपल्याला कुणाचीही रोजीरोटी हिरावून घ्यायची नाही. पण जीवांची काळजी घ्यावीच लागणार. सरकारला लॉकडाऊन करण्यास आवडत नाही. ही लढाई एकट्या सरकारची नाही तर सर्वांची. अशावेळी सर्वांनी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांना साथ दिली पाहिजे, याचे राजकारण नको अशी भूमिका मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.