Dehuroad corona Update : कॅन्टोन्मेंट हद्दीत 20 नवीन रुग्णांची भर; 14 जणांना डिस्चार्ज

आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 976 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

एमपीसीन्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड  हद्दीत चिंचोली आणि मेन बाजार येथे सर्वाधिक 5, किन्हई येथे 4, श्रीविहार सोसायटी येथे 3, थॉमस कॉलनी येथे 2, तर सिद्धिविनायक नगरी येथे 1 अशा एकूण 20 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची आज, शुक्रवारी नोंद झाली.

तर कोरोनावर यशस्वी मात केलेल्या 14 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

आजपर्यंत हद्दीत एकूण 976 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याचे कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून सांगण्यात आले.

देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाच्या वतीने आज, शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजेपर्यंतचा कोरोना अहवाल प्रसिद्धीस  दिला आहे.

त्यामध्ये कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत 20 नवीन रुग्णांची नोंद झाल्याचे म्हटले आहे. आजपर्यंत कॅन्टोन्मेंट हद्दीत  एकूण 976 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

आज, 14 रुग्ण कोरोनातून बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आजपर्यंत एकूण 810 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. सध्या 140 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

यापैकी सध्या 17 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.

महात्मा गांधी कोविड केअर सेंटरमध्ये 59 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यामध्ये कॅन्टोन्मेंट हद्दीतील 37 आणि हद्दीबाहेरील 19 रुग्णांचा समावेश आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिका कोविड सेंटरमध्ये 5 रुग्णावर उपचार सुरु आहेत.

81 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, हद्दीतील कोरोना मृतांची संख्या 26 इतकी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.