Pune Corona Update : 1573 रुग्ण कोरोनामुक्त, 1938 नवे रुग्ण, 38 जणांचा मृत्यू

सध्या शहरात 917 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 470 जण व्हेंटिलेटरवर आहेत.

एमपीसी न्यूज – पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून रुग्ण मोठ्या प्रमाणात बरे होत आहेत. शुक्रवारी (दि. 11 सप्टेंबर) तब्बल 1573 नागरिक या आजारातून मुक्त झाले. 6 हजार 588 कोरोनाच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 1 हजार 938 नवे रुग्ण आढळले. 38 जणांचा मृत्यू झाला.

सध्या शहरात 917 क्रिटिकल रुग्ण असून, त्यात 470 जण व्हेंटिलेटरवर आहेत. कोरोनाचे पुणे शहरात 1 लाख 15 हजार 770 रुग्ण झाले आहेत. 96 हजार 25 रुग्णांनी वेळीच उपचार घेतल्याने कोरोनावर मात केली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे 2 हजार 706 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. 17 हजार 39 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे देण्यात आली आहे.

पुणे शहरात कोरोनाच्या आजारातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कोरोनावर सध्या काहीही औषध नसले तरी सॅनिटायजर, मास्क, फिजिकल डिस्टन्स पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी पुणे महापालिकेतर्फे विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, तर काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुण्यात सर्वाधिक कोरोनाच्या चाचण्या करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.