Dehuroad Corona Update : बरलोटा नगर येथे दोन नवीन कोरोना रुग्णांची नोंद

एमपीसी न्यूज : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत आज (गुरुवारी ) बरलोटा नगर येथे दोन नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. हद्दीत 14 ॲक्टिव्ह रुग्ण असल्याची माहिती कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाने दिली.

कॅन्टोन्मेंट प्रशासनाने आज, सायंकाळी पाच वाजता प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यंत हद्दीत एकूण 1341 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

त्यातील एकूण 1292 रुग्ण उपचारातून बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. होम आयसोलेशनमधील रुग्णांची संख्या 11 असल्याचे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

महात्मा गांधी कोविड सेंटरमध्ये 2 रुग्ण उपचारासाठी दाखल आहे. तर रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरु आहे.

कोरोनामुळे आजपर्यंत 35 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णालयात दाखल रुग्णांची आरोग्य स्थिती चांगली असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.