Dehuroad : दानशूर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्त्यांसह व्यापाऱ्यांचा ‘कॅन्टोन्मेंट’ला मदतीचा हात

Dehuroad: Generous people, social activists, traders a helping hand to Cantonment Board

एमपीसी न्यूज : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्यावतीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांनीही ‘कॅन्टोन्मेंट’ला आर्थिक मदत दिली आहे.

त्याचबरोबर सदस्य विशाल खंडेलवाल यांचे बंधू व किराणा मालाचे व्यापारी नीरज खंडेलवाल यांनी ‘कॅन्टोन्मेंट डेव्हलपमेंट फंड – COVID-19’ साठी 51 हजार रुपयांची मदत केली आहे.

या मदतीचा धनादेश देहूरोड बाजारपेठेतील जेष्ठ व्यापारी व नीरज यांचे वडिल सुभाष खंडेलवाल यांच्याहस्ते  कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामस्वरूप हरितवाल यांच्याकडे आज ( शुक्रवार) सुपूर्द करण्यात आला. या वेळी बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार, सदस्य विशाल खंडेलवाल, हाजीमलंग मारीमुत्तू, ललित बालघरे, सारिका नाईकनवरे, अरुणा पिंजण, गोपाळ तंतरपाळे आदी उपस्थित होते.

भरीव आर्थिक मदत केल्याबद्द्ल नीरज खंडेलवाल यांचे प्रशासनाच्यावतीने आभार मानण्यात आले.

तसेच यापूर्वी सेट जुड शाळा देहूरोड यांनी 1,20,000 रुपये, शेलरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते नवनाथ पंढरीनाथ भेगडे यांनी 5000, शिक्षिका वंदना कुंभार 15000, दीपिका वेळापुरे 5001, दिनेश वारके 2500, नरेंद्र महाजनी 1000, बोर्ड सदस्य रघुवीर शेलार 8320, सारिका नाईकनवरे 7320, हाजीमलंग मारीमुत्तू 21960, गोपाळराव तंतरपाळे यांनी एप्रिल पासून पुढील सर्व मानधन, विशाल खंडेलवाल 21960, राहुल बालघरे 7320 आणि अरुणा पिंजण यांनी 21960 रुपयांची मदत केली.

तसेच देहूरोड कॅन्टोमेंटच्या सर्व कामगारांनी आपला एक दिवसाचा पगार मिळून एकूण 3,18,000 पंतप्रधान सहाय्यता निधीला मदत केला असल्याची माहिती उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांनी दिली.

कोरोनाचे संकट गंभीर आहे. या महामारीचा मुकाबला करण्यासाठी केंद्र सरकार, राज्य सरकार आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाकडून आवश्यक ते सर्व प्रयत्न व उपाययोजना केल्या जात आहेत. याकामी शहरातील दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योजक, नागरिक, तसेच संस्था व संघटना यांनी देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाला आपल्या इच्छेनुसार  शक्य  ती मदत करावी. यासाठी कार्यालयीन अधीक्षक आर. एम. सावंत ( ९३७०९५०८३६), आरोग्य निरीक्षक किरण गोंटे ( ९३७०९५०८४३ ) यांच्याशी संपर्क साधावा. रघुवीर शेलार : उपाध्यक्ष, देहूरोड कॅन्टोमेन्ट बोर्ड.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.