Dehuroad News : सामाजिक उपक्रमांद्वारे शिवसेनेचा वर्धापनदिन साजरा

 एमपीसीन्यूज : वृक्षारोपण, अन्नदान, सफाई कामगार महिलांना जीवनावश्यक साहित्य वाटप आदी सेवाभावी उपक्रम राबवून देहूरोड शहर शिवसेनेच्यावतीने शिवसेनेचा ५५ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी युवा सेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कारही करण्यात आला.

देहूरोड शहरात स्वामी विवेकानंद चौक येथे सफाई कामगार महिलांना जीवनावश्यक साहित्य किट वाटप करण्यात आले.

शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजू खांडभोर, उपशहर प्रमुख संदिप बालघरे, कैलास करमारे, संदिप गोंटे, राजू शेलार, अरुण गोंटे, शशि सपागुरू, विलास हिनकुले, मेहेरबान सिंग, महेश धुमाळ, बबन पाटोळे, सन्नी कदम, संतोष बालघरे, नितीन पिजंण, लालचंद शर्मा, गणेश सावंत, रत्नमाला गोंटे, अमर केजंळे उपस्थित होते.

देहूरोड रेल्वे स्थानक येथील जुना कॅन्टोनमेंट जकातनाका येथे गोरगरीब नागरिकांना अन्नदान करण्यात आले. या वेळी युवा सेना पिंपरी चिंचवड उपशहर अधिकारी राजेंद्र तरस, युवा सेना उपतालुका अधिकारी विशाल दांगट, शहर युवा अधिकारी संदीप भुम्बक यांचा सत्कार करण्यात आला.

शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, शिवसेना शहरप्रमुख भरत नायडू, महिला आघाडी शहर संघटीका सुनंदा आवळे, उपशहर संघटीका निलम गावडे, लक्ष्मी मिनगी, पोपट राक्षे, देवा कांबळे, विलास हीनुकुले, सुरेश मुळे, रामदास अलगिरे, प्रेम गुप्ता, अशोक मुळीक, बाबा राउत, अमर भुम्बक, महेश डेव्हिड, विशाल जाधव, सुरेश भंडारी, विनोद गुरू, आकाश कटारिया आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.