Dehuroad News : ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वृक्ष लागवडीचा उपक्रम कौतुकस्पद : सुलभा उबाळे

एमपीसीन्यूज : कोरोना महामारीने सर्वांनाच ऑक्सिजनचे महत्व कळले आहे. वातावरणात मोफत मिळणाऱ्या ऑक्सिजनसाठी लाखो रुपये खर्च करण्याची वेळ अनेकांवर आल्याचे आपण पाहिले आहे. ऑक्सिजनचे महत्व ओळखून युवा सेनेच्या वतीने ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या वृक्ष रोपांची लागवड करण्याचा निर्णय घेतला.  देशी वृक्ष लागवडीचा हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी काढले.

आदित्य जनसेवा सप्ताहानिमित्त युवा सेना मावळ तालुका यांच्या वतीने देहूरोड येथील श्री शंकर मंदिर परिसरात सुलभा उबाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या.

युवा सेनेचे विशाल दांगट यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. मावळ तालुका युवा सेना अधिकारी अनिकेत घुले, शिवसेना मावळ तालुका समन्वयक रमेश जाधव, महिला आघाडी विभाग संघटिका भारती चकवे,   पिंपरी चिंचवड युवा सेनेचे राजेंद्र तरस, संदीप भुम्बक, शिवसेना सल्लागार देवा कांबळे, सुरेश मुळे, रामदास हलगिरे, राजू गोगलिया, प्रेम गुप्ता, आदित्य बारणे, यश दांगट, ओमकार दांगट, सोहेल शेख, अहमद खान, कुणाल टक्के, राहुल यादव, अजय तुपे, इलियास शेख आदी उपस्थित होते.

यावेळी शंकर मंदिर प्रांगणासह परिसरात रस्त्यालगत देशी वृक्षरोपांची लागवड करण्यात आली. यामध्ये वड, पिंपळ, चिंच आदी वृक्षरोपांचा समावेश होता.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.