Dehuroad News : गांजा ओढणा-या दोघांना अटक

एमपीसी न्यूज – पुनागेट हॉटेलच्या समोर मोकळ्या जागेत गांजा ओढत बसलेल्या दोघांना पोलिसांनी अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि. 26) सायंकाळी करण्यात आली.

केशव सुरेश घोलप (वय 20, रा. लांडगे आळी, भोसरी), मयूर दीपक जगदाळे (वय 23, रा. आदर्शनगर, देहूरोड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार संतोष दिघे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी पावणेसातच्या सुमारास आदर्शनगर बस स्टॉप जवळ पूनागेट हॉटेलच्या समोर विरुद्ध दिशेला असलेल्या मोकळ्या मैदानात एका झाडाखाली आरोपी गांजा ओढत बसले होते. याबाबत माहिती मिळाली असता पोलिसांनी कारवाई करून दोघांना अटक केली. त्यांच्याकडून पोलिसांनी सहा ग्रॅम वजनाचा 180 रुपयांचा गांजा व इतर साहित्य जप्त केले आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.