Pune News : ब्रेक फेल एसटीची पाच ते सात गाड्यांना धडक

एमपीसी न्यूज –  ब्रेक फेल झाल्यामुळे पुण्यातील सातारा रस्त्यावर हाटेल रविकांतजवळ एसटीने पाच ते सात गाड्यांना धडक दिली.यामध्ये अद्याप तरी कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.या अपघातात चारचाकींचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.त्याशिवाय एसटीसुध्दा फुटली.या अपघातात तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

शंकर महाराज उड्डानपुलावर हा अपघात झाला.यावेळी बसखाली काही दुचाकी आल्या आहेत.गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे.अपघातानंतर पोलिसांनी तत्काळ वाहतूक सुरळीत करण्यास सुरूवात केली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.त्यांना भारती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.