Manish Sisodia Arrested : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदियांना CBIने केली अटक

एमपीसी न्यूज : दिल्ली दारू घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. तत्पूर्वी मद्य धोरण घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने त्यांची चौकशी केली. या चौकशीसाठी ते सकाळी 11.10 वाजता दिल्लीतील  सीबीआयच्या मुख्य कार्यालयात पोहोचले होते. (Manish Sisodia Arrested) चौकशीला सामोरे जाण्याआधी ते आप पक्षाचे नेते संजय सिंह आणि सौरभ भारद्वाज यांच्यासह राजघाटावर पूजा करण्यासाठी गेले होते.

दरम्यान, मनीष सिसोदियांची सीबीआयकडून चौकशी सुरू असताना आपच्या अनेक नेत्यांनी सीबीआय मुख्यालयाबाहेर आंदोलन केलं. मात्र मुख्यालयाबाहेर कलम 144 लागू झाल्याने जवळपास 50 नेत्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं.

Chinchwad Bye-Election : विजयाची खात्री; महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा विश्वास

आम आदमी पक्षाने दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याचे पोस्टर जारी केले होते. दोन पानांच्या या पोस्टरवर मनीष सिसोदिया यांचा फोटोही छापण्यात आला होता. खोट्या गुन्ह्यांची आम्हाला भीती वाटत नाही. आम्हाला तुरुंगात जाण्याची भीती नाही.  (Manish Sisodia Arrested) आम्ही भगत सिंह आणि बाबासाहेबांचे अनुयायी आहे आणि आम्ही मृत्यूशी सामना करायलाच निघालोय असं सिसोदियांनी म्हटलं होतं.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.