Pune : 100 जागा दिल्या तरीही शिवसेना युती करेल, अन्यथा पक्ष फुटण्याची भीती – जितेंद्र आव्हाड

एमपीसी न्यूज – 100 जागा दिल्या तरीही शिवसेना भाजपशी युती करेल, अन्यथा त्यांना पक्ष फुटेल, अशी भीती आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. 
पुण्यात एका कार्यक्रमात आव्हाड आले असता, पत्रकारांशी ते बोलत होते. शरद पवार आमचे अमिताभ बच्चन आहेत. पण, आमचा पक्ष म्हणजे काही मल्टीस्टार सिनेमा नाही, अशी मीश्किल टिप्पणीही त्यांनी केली. महाराष्ट्राच्या राजकारणावर शरद पवार यांची पकड आहे, त्यामुळेच त्यांच्यावर भाजपकडून टीका होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना पाकिस्तानची साखर चालते, कांदा चालतो, नवाज शरीफ यांना दिलेली अचानक भेट, बिर्याणी सगळं चालतं, फक्त इथे येऊन पाकिस्तानवर टीका करायची. निवडणूक जर महाराष्ट्राची आहे, तर शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, बंद पडलेले साखर कारखाने, या विषयावर मोदी का बोलत नाही? असा प्रश्नही आव्हाड यांनी उपस्थित केला.
MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like