Alandi : योगिनी एकादशी निमित्त माऊली मंदिरात भाविकांची गर्दी

एमपीसी न्यूज –  योगिनी एकादशी निमित्त दि.14 जून रोजी आळंदीतील (Alandi ) माऊलीं मंदिरात फुलांची आकर्षक अशी फुलसजावट करण्यात आली होती. तसेच, संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर संजीवन समाधी करिता भाविकांनी मंदिरात गर्दी केली होती.

Bhosari : 45 दिवसात पैसे डबल करून देतो म्हणत तरुणाची फसवणूक

मंदिरामध्ये भाविकांसाठी प्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसादाचा लाभ अनेक भाविकांनी घेतला. पालखी प्रस्थान सोहळ्या निमित्त तयार करण्यात आलेले मदत केंद्र, मंडप काढण्याचे कार्य शहरात दिसून येत होते. नदी घाटावरती व शहरात पालिके मार्फत कर्मचारी स्वच्छतेचे कार्य करत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.