Dighi : काम देण्याच्या बहाण्याने तरुणाची 13 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – फ्री लान्सिंग जॉब असल्याचे सांगून पेड (Dighi) टास्क देत तरुणाकडून 13 लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला कोणताही जॉब अथवा त्याने दिलेले पैसे परत न करता फसवणूक केली. ही घटना 24 ते 30 जून या कालावधी आदर्शनगर, दिघी येथे घडली.

सोहन शत्रुघ्न प्रसाद (वय 29, रा. आदर्शनगर, दिघी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार  8247002803 क्रमांक धारक आणि सोशल मिडिया धारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Chinchvad Post : फराळ निर्यातीतून चिंचवड पोस्टाला 12 लाखांचे उत्पन्न

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोहन यांना एका महिलेने फोन करून तिच्याकडे फ्री लान्सिंगमध्ये जॉब असून तिथे जॉईन केल्यास फायदा होईल असे सांगितले.

त्यानंतर वेगवेगळ्या लिंक पाठवून सोहन यांना वेगवेगळ्या रकमेचे टास्क दिले. त्यांच्याकडून वेगवेगळ्या बँक खात्यावर पैसे घेतले. ते पैसे त्यांना परत न करता त्यांची फसवणूक केली. दिघी पोलीस तपास करीत (Dighi) आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.