Akurdi : बांधकाम व्यावसायिकाच्या फसवणूक प्रकरणी तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज –  बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत असताना (Akurdi) परस्पर धनादेश बँक खात्यात जमा केले. तसेच कार्यालयातून धनादेश, इतर कागदपत्रे आणि साहित्य चोरून नेले. याप्रकरणी तीन कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार 14 मार्च ते 7 नोव्हेंबर 2023 या कालावधीत जय गणेश व्हिजन आकुर्डी येथे घडला.
नितीन रघुनाथ मोरे (वय 28, रा. रुपीनगर), संजय नारायण पाटील (वय 45, रा. चिखली) आणि एक महिला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नितीन शंकर धिमधिमे (वय 42, रा. जय गणेश व्हिजन, आकुर्डी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Dighi : काम देण्याच्या बहाण्याने तरुणाची 13 लाखांची फसवणूक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी नितीन मोरे हा फिर्यादी यांच्या कार्यालयात काम करत असताना त्याने फिर्यादी यांनी सह्या करून ठेवलेले कोरे धनादेश परस्पर संजय पाटील आणि महिलेच्या खात्यावर भरले.

संजय पाटील याच्या खात्यात भरलेल्या धनादेशावर 20 लाख रुपये रक्कम टाकली. तर महिलेच्या खात्यावर 18 लाख 50 हजार रुपये रक्कम आरटीजीएस द्वारे जमा केली. फिर्यादी यांनी बँकेत जाऊन हे दोन्ही व्यवहार थांबवल्याने दोन्ही रकमा त्यांच्या खात्यात (Akurdi) परत आल्या.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.