Dighi : सोसायटीच्या मिटिंगमध्ये एकास मारहाण; सोसायटी चेअरमनसह दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – सोसायटीच्या मिटिंगमध्ये बिल्डरकडून (Dighi) मेंटेनन्सचे पैसे कधी मिळणार? असे विचारल्याने एकास दोघांनी बेदम मारहाण केली. रविवारी (दि. 26) सकाळी चऱ्होली येथे घडली.

मंदीप सिंग (वय 35), श्रीनिवास रकाले (वय 35, रा. चऱ्होली) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी मनोरंजनकुमार सत्येंद्र सिंग (वय 36, रा. चऱ्होली) यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan Crime : महावितरणच्या विद्युत सहायकास मारहाण; तिघांना अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या सोसायटीमध्ये सोसायटी सभासदांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती. त्यात फिर्यादी यांनी विचारले कि, सोसायटीचे बिल्डर आमचे मेंटेनन्सचे पैसे परत कधी देणार व किती देणार, यावरून आरोपी मंदीप आणि चेअरमन आरोपी श्रीनिवास याने फिर्यादी यांना शिवीगाळ, दमदाटी (Dighi) केली.

फिर्यादीच्या हाताच्या बोटाला दुखापत केली. चेअरमन श्रीनिवास याने फिर्यादीस हत्याराने मारून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.