Dighi : भरधाव मोटारीची वाहतूक पोलिसाला धडक

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या मोटारीने कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिसाला धडक दिली. यामध्ये वाहतूक पोलीस जखमी झाला. ही घटना शनिवारी (दि. 29) दुपारी साडेतीनच्या सुमारास देहू फाटा चौक आळंदी येथे घडली.

पोलीस शिपाई रवींद्र सरमहाले (रा. तापकीर नगर, पंचम सृष्टी अपार्टमेंट, आळंदी) हे जखमी झाले आहेत. त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार (एम एच 18 / ईसी 1147) या कार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस शिपाई रवींद्र सरमहाले देहू फाटा चौक आळंदी येथे कर्तव्यावर होते. दुपारी साडेतीनच्या सुमारास वरील कार वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून भरधाव वेगात आली. त्यामुळे फिर्यादींनी कार चालकाला कार थांबवण्याचा इशारा केला. मात्र कार चालकाने भरधाव वेगात फिर्यादी यांना धडक दिली. यामध्ये सरमहाले जखमी झाले. त्यांना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.