Dighi : ट्रकच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू; दाभाडेवस्ती च-होली येथील घटना

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या ट्रकने पादचारी व्यक्तीला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 22) दुपारी पाचच्या सुमारास दाभाडेवस्ती च-होली येथे घडली.

प्रताप नागनाथ झोंबाडे (वय 40) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार गणेश दशरथ कळके यांनी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गणेश सिताराम घायतिडके (वय 30 रा. ओझर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रताप झोंबाडे त्यांच्या पत्नी सोबत बुधवारी दुपारी पाचच्या सुमारास च-होली बुद्रुक येथील दाभाडेवस्ती मधून रस्त्याने पायी चालत जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्यांना धडक दिली. यामध्ये प्रताप झोंबडे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. दिघी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.