pimpri : महिंद्राच्या 403 कामगारांसाठी दिवाळी धमाका

लॉजिस्टिक्स उद्योगातील ऐतिहासिक वेतनवाढ करार

एमपीसी न्यूज : लॉजिस्टिक उद्योग क्षेत्रातील सर्वाधिक वेतनवाढीचा ऐतिहासिक करार महिंद्रा लॉजिस्टिक्स लि. आणि स्वाभीमानी श्रमिक कामगार संघटना यांच्यात करण्यात आला. कामगारांना आगामी साडेतीन वर्षांसाठी दहा हजार रुपयांची पगारवाढ देण्यात आली. विशेष म्हणजे, संघटनेच्या प्रयत्नांमुळे तब्बल 403 कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरीत समाविष्ट करण्यात आले, अशी माहिती संघटनेचे सल्लागार आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी दिली.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील निघोजे येथे महिंद्रा लॉजिस्टीक्स लि. कंपनी आहे. या कंपनीतील स्वाभिमानी श्रमिक कामगार संघटना आणि व्यवस्थापनाच्या प्रतिनिधींची गेल्या अनेक दिवसांपासून वेतनवाढ आणि अन्य मागण्यांबाबत चर्चा सुरू होती. आमदार महेश लांडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि.2) कंपनीचे व्यवस्थापन प्रतिनिधी आणि संघटनेच्या पदाधिका-यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी द्विपक्षीय पदाधिकार्यांनी स्वाक्ष-या करुन कराराचे आदन- प्रदान करण्यात आले.

यावेळी सघंटनेचे प्रमुख सल्लागार रोहीदास गाडे, स्वाभिमानी श्रमिक कामगार सघंटनेचे अध्यक्ष जीवनशेठ येळवंडे, युनिट अध्यक्ष प्रंशात उर्फ आप्पा पाडेकर, सरचिटणीस कृष्णा रोहोकले, उपाध्यक्ष शाम सुळके, रघुनाथ मोरे, सचिव तेजस बिरदवडे, खजिनदार अमृत चौधरी, सोमनाथ जानराव, युनिट उपाध्यक्ष दत्ता मुळुक, खजिनदार बिभीषन घोडके, सरचिटणीस अभय भेगडे, चिटणीस दत्ता येळवंडे, संघटक कुणाल कोळेकर, किरण दौडकर, संतोष बेडांले, प्रदीप पिगंळे आदी उपस्थित होते.

व्यवस्थापनाच्या वतीने महिंद्रा कपंनीचे उपाध्यक्ष विजय नायर, महिंन्द्रा लॉजिस्टीकचे व्ही. पी मेहेरनोश मेहेता, जनरल मॅनेजर एच. आर. प्रदीप झोटीगं, सीनिअर एच. आर. व्यवस्थापक तुषार टोनगे, प्रॉडक्शन हेड मुकेश कपुर, आत्माराम शेटटी, धीरज सिगं, महीन्द्रा कपंनीचे जनरल मॅनेजर कंरदीकर यांनी स्वाक्ष-या केल्या आहेत. जनरल मॅनेजर श्री प्रदिप झोटीगं यांनी प्रास्ताविक केले. कृष्णा रोहोकले यांनी आभार मानले.

आमदार महेश लांडगे म्हणाले, कोणत्याही कंपनीची वाटचाल ही कामगारांच्या कष्टावर अवलंबून असते. मात्र, कंपनी टिकली, तर कामगार आणि त्यांची नोकरी टिकणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्याची जाणीव संघटनेच्या पदाधिका-यांनी कामगारांना करुन दिली पाहिजे. आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी कंपनीविरोधात आंदोलन हा पर्याय नाही. व्यवस्थापनाशी सकारात्मक चर्चा करुन सामोपचाराने समस्या सोडवण्यावर आम्ही भर दिला आहे. व्यवस्थापनाकडून अपेक्षा ठेवताना उत्पादन क्षमतेबाबत दिलेला शब्द कामगार आणि संघटनेने पाळला पाहिजे. तसेच, कामगारांसाठी निस्वार्थपणे काम केल्यामुळेच आज 403 कंत्राटी कामगारांना कायमस्वरुपी नोकरी मिळाली आहे.

कामगार-व्यवस्थान करारातील ठळक मुद्दे 

१) १० हजार रुपयाची पगार वाढ
२) कराराचा कालावधी आगामी साडेतीन वर्षे
३) तब्बल ४०३ कंत्राटी कामगारांना कायम नोकरी
४) कामगारांचा एक लाख रुपयांचा मेडिक्लेम
५) ग्रुप एस्किडेंट पॉलिसी ५ लाख रूपये
६) पगारी सुट्या २० व साठवण्याची मर्यादा ३०
७) कामगारांना मरनोत्तर अर्थसहाय्य योजना
८) पगाराची उचल- एक महिन्याचा पगार
९) ‘ओटी’ दोनपट, पगारी सुट्टीत काम केल्यास दोनपट ‘ओटी’ व एक ‘सीऑफ’
१०) एक टी-शर्ट, दोन ड्रेस, एक सेप्टी श्यूज देणार
११) कामगारांसाठी वार्षिक स्नेहसंमेलन
१२) प्रतिवर्षी दोन गुणवंत कामगार पुरस्कार
१३) दिवाळी बोनस : पहिल्या वर्षी १८ हजार रुपये. दुस-या वर्षी १९ हजार ८०० रुपये, तिस-या वर्षी २२ हजार २०० रुपये.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.