Diwali Celebration : कॅन्सरग्रस्तांसोबत साजरी होणार दिवाळी विथ परपज

पुणे : केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पीटलने कॅन्सर रुग्णांसोबत दिवाळी कमांड हॉस्पिटल के चरक सभागृहात साजरी केली. यावेळी मेजर जनरल बी.के गोयल, व्हीएसएम कमांडंट, कमांड हॉस्पिटल, पुणे, ले.ज. एम. ए. तुताने, महाराष्ट्र सरकारचे आरोग्य मंत्री सल्लागार डॉ. सुभाष. आर साळुंके, सकाळचे संपादक सम्राट फडणविस, संस्थेचे संचालक एन.एस. न्यायपथी सोबत कॅन्सर रुग्णांचे नातेवाईक, नर्स, मावशी आदी उपस्थित हेाते.

मोफत रुग्णांवर सर्वोत्तम उपचार करणार्‍या केअर इंडिया मेडिकल सोसायटी आणि विश्रांती हॉस्पिटलचे कार्य अतुलनीय आहे, ही संस्था म्हणजे कर्करोगाच्या रुग्णांसाठी देव आहे, अशी भावना रुग्णांच्या नातेवाइकांनी यावेळी व्यक्त केली. दिवाळी विथ परपज कार्याक्रमात रुग्णांच्या नातेवाईक भावोत्कट झाले होते. रुग्णांची याठिकाणी एक आई जशी करते त्याप्रमाणे केली जाते, विश्रांती हे एक मंदीरच आहे, ही भावना व्यक्त करताना अश्रू अनावर झाले.

कर्करोगाच्या उपचारात रुग्णाला तीव्र वेदना होतात. त्यासाठी वेदना व्यवस्थापन करणे आवश्यक असते. अनेकदा मृत्यू अटळ असतो. त्या शेवटच्या क्षणापर्यंत वेदनारहित देण्याचा प्रयत्न संस्था करते. मृत्यूशय्येवर असलेल्या रुग्णांला आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक आधार देण्याचे महत्वाचे कार्य संस्था करते. त्याबद्दल नातेवाईकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.