अस्मानी संकटातही राज्य सरकार ‘बळीराजा’ सोबत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रू पुसरणार : आनंद रेखी

एमपीसी न्यूज – राज्यात परतीच्या पावसाच्या विक्राळ रुपात अन्नदाता बळीराजावर अस्मानी संकट कोसळले आहे. या संकटामुळे हाती आलेले उभं पीक गमावल्याने शेतकरी हवालदील झाले आहेत.

अशात त्यांना भक्कम आधाराची गरज असल्याचे मत व्यक्त करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे दिलासात्मक आश्वासन भाजप नेते आनंद रेखी यांनी गुरूवारी दिले आहे.

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील पंचनामे लवकरात लवकर पुर्ण करावे यासाठी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे रेखी यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या स्थितीची जाणीव फडणवीस साहेबांना आहे. देशाच्या उर्जादात्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याएवढेच ते संवेदनशील आहेत.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम त्यामुळे फडणवीस साहेब नक्की करतील,असा विश्वास यानिमित्ताने रेखी यांनी व्यक्त केला.
राज्यात यंदा जवळपास १ कोटी ४१ लाख हेक्टरवर खरीप पेरणी झाली होती. परंतु, यातील जवळपास २९ लाख हेक्टर क्षेत्रावर पीक नुकसान झाले आहे.धान, कांदा, द्राक्षे, सोयाबीन आणि कापसाला परतीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. मका, बाजरी, टोमॅटो, मिरची, कोबी तसेच इतर भाजीपालाशेती देखील प्रभावित झाली आहे. सणासुदीच्या काळात कोसळलेल्या या संकटामुळे शेतकरी बांधव पार खचला आहे. परंतु, राज्य सरकार शेतकर्यांना एकटे पडू देणार नाही. त्यांना लवकरच मदत मिळेल, असा विश्वास रेखी यांनी व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.