Loksabha election 2024 : माझ्या मनाला मुरड घालून मी निवडणुकीतून माघार घेतली – विजय शिवतारे

एमपीसी न्यूज : आपल्यामुळे महायुतीला आणि मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून बारामती लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतली आहे असे विजय शिवतारे यांनी  आज (दि.11)  रोजी सासवड पालखीतळावर होणाऱ्या महायुतीच्या मेळाव्यापूर्वी (Loksabha election 2024 )सांगितले.

मागील 5 वर्षांपासून पुरंदरमधील कामे झालेली नाहीत. पुरंदर येथे  विमानतळ, आयटी हब होणार होते.  जेजुरी देवस्थानाला 100 कोटी मिळणार होते, ते पण अजून मिळालेले नाहीत. तसेच येथील पाण्याचा प्रश्न अजिबात सुटलेला नाही. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी मी पहिल्यापासूनच आग्रही असून मी लोकसभेची निवडणूक लढवावी अशी माझ्या कार्यकर्त्यांची इच्छा होती परंतू आपल्यामुळे महायुतीला आणि मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून बारामती लोकसभा निवडणुकीमधून माघार घेतली आहे असे विजय शिवतारे म्हणाले.

Raj Thackeray:जोरात विधानसभेच्या कामाला लागा-राज ठाकरे

आमच्या प्रलंबित मागण्या मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापुढे मांडल्या आहेत आणि त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सर्व मांडण्यावर सविस्तर चर्चा करून मार्गी लावण्यात येतील असे आश्वासन दिले आहे. आपल्यामुळे महायुतीला आणि मुख्यमंत्र्यांना त्रास होऊ नये म्हणून  मी आमच्या कार्यकर्त्यांसह बारामती लोकसभा मतदारसंघात महायुतीसाठी (Loksabha election 2024) काम करणार आहे तसेच सुनेत्रा पवारांच्या प्रचाराला आम्ही लागलो आहे. येत्या निवडणुकीत आम्ही त्यांनाच विजयी करु, असा विश्वास  विजय शिवतारे यांनी व्यक्त केला.

आज (दि.11)  रोजी सासवड पालखीतळावर बारामती लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या प्रचारार्थ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थिती लावणार आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.