Pimpri : पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या वतीने क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची 197 वी जयंती नेहरूनगर (Pimpri) येथील कोर्टात साजरी करण्यात आली.

यावेळी पिंपरी न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. बगे, माजी अध्यक्ष ॲड. नाना रसाळ, अध्यक्ष ॲड. प्रमिला गाडे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण  करण्यात आला. न्यायालयाच्या सरकारी अभियोक्ता साधना बोरकर, माजी अध्यक्ष ॲड. सुनील कडुस्कर, उपाध्यक्ष ॲड. गोरख कुंभार, ॲड. नितीन कांबळे, ॲड. संभाजी वाघमारे, ॲड. सुनील माने, ॲड. उमेश गवळी यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवन प्रवासावर माहिती देत महात्मा फुले यांना अभिवादन केले.

Chinchwad : महात्मा फुले यांनी श्रमाला प्रतिष्ठा दिली – काशिनाथ नखाते

यावेळी ॲड. बी. के. कांबळे, ॲड. नितीन कांबळे, ॲड‌. सागर अडागळे , ॲड. प्रशांत भडकुंभे, ॲड. प्रविण जगताप, ॲड. विजय फडतरे, ॲड. उमेश गवळी, असोसिएशनचे सहसचिव ॲड. श्रीराम गालफाडे, सदस्य ॲड. जयेश वाघचौरे, ॲड. सुर्यकांत शिंदे, ॲड. राहुल बावीस्कर, ॲड. विनोद आढाव आदी वकील बांधव (Pimpri) उपस्थित होते.

सूत्रसंचालन असोसिएशनचे सदस्य ॲड. विशाल पौळ यांनी केले. ॲड. तेजस चवरे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.