Diwali Muhurta : धनत्रयोदशी दोनदा? सूर्यग्रहण आणि करी दिन? दिवाळी कशी साजरी करावी? जाणून घेऊ

एमपीसी न्यूज : यंदाची दिवाळी ही खास (Diwali Muhurta) आहे. कोरोना सारख्या मोठ्या संकटातून आपला देश यशस्वीरित्या बाहेर आला आहे. आणि दोन वर्षांनी आपण निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करणार आहोत. परंतु, यंदाची दिवाळीत दोन धनत्रयोदशी आल्याने सर्वांचा गोंधळ उडालेला आहे. यासाठी दाते पंचांगचे प्रमुख मोहन दाते यांनी ‘एबीपी माझा’च्या मुलाखतीमध्ये त्यांनी यंदाची दिवाळी कोणत्या मुहूर्तावर कधी साजरी करायची याची माहिती दिली आहे. जाणून घेऊ सविस्तर –

धनत्रयोदशी – आपण पंचांगानुसार दिवाळीचा पहिला दिवा हा धनत्रयोदशीला लावतो. त्यामुळे 22 ऑक्टोबर रोजी धनत्रयोदशी आहे. पण, यंदा दोन दिवस धनत्रयोदशीचा मुहूर्त आलेला आहे. हे कसे शक्य आहे? तर दाते यांच्या मते, दोन संकष्टी-एकादशी येऊ शकतात तसेच धनत्रयोदशी येऊ शकते. साधारणपणे 22 ऑक्टोबर रोजी मुंबई, पुणे, नाशिक, सांगली, कोल्हापूर या ठिकाणी शनिवारी तर विदर्भ आणि मराठवाड्यात रविवारी पूजायची आहे. धन्वंतरी (Diwali Muhurta) हा वैद्यांचा देव आहे, त्यांचीही पूजा करून आरोग्यम धनसंपदा प्राप्ती करायची आहे.


नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन – 24 ऑक्टोबर रोजी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मी पूजन एकाच दिवशी आलेली आहे. त्यामुळे सकाळी अभ्यंग स्नान करायची तर दुपारी 3 वाजल्यापासून आपल्या घरातील लक्ष्मी पूजन सुरू करायचे आहे.

Kotwal : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांची कोतवालांना पदोन्नतीची विशेष भेट


सूर्यग्रहणाने काय फरक पडेल? – 25 ऑक्टोबर रोजी भाकड दिवस आहे. खंडाग्रास सूर्यग्रहण आला असला, तरी सर्व प्रकारची पूजा अथवा विधी आपण करू शकतो. फक्त शास्त्रानुसार वेदकाळात भोजन घेऊ नये अन्यथा सर्व कामे करू शकतो. दुपारी 4 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत हे ग्रहण दिसणार आहे. भारतातले सूर्यग्रहण हे जास्तीत जास्त संध्याकाळी 6.30 शेवट असू शकतो. त्यामुळे 6.35 नंतर मोक्षस्थान करून आपण पुढील पूजा विधी करू शकतो.


करी दिन की पाडवा? 26 ऑक्टोबर रोजी सूर्यग्रहणाचा दूसरा दिवस म्हणजे करी दिन आहे. हा दिवस अशुभ असतो. या दिवशी लग्न, मुंज, बारसे असे विधी करू शकत नाही. परंतु, याच दिवशी दिवाळी पाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक असा शुभ दिवस आलेला आहे. त्यामुळे या दिवशी आपण कोणतेही शुभ कार्य निश्चित करू शकतो. तसेच, पत्नीने पतीला ओवाळून पतीने पाडव्याची ओवाळणी देयाचीच आहे, पण त्या दिवशी भाऊबीज (Diwali Muhurta) असल्यानेही भावाने बहिणीला ओवाळणी देयची आहे.

अशा प्रकारे आपण विधिवत पंचांगप्रमाणे आपला दिवाळी सण उत्साहात साजरा करू शकतो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.