MLA Sunil Shelke : आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके (MLA Sunil Shelke) यांच्या वाढदिवसानिमित्त टाकवे बुद्रुक येथे होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. टाकवे बुद्रुकचे सरपंच भूषण असवले, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस मावळचे माजी अध्यक्ष शिवाजी चिधु असवले, माजी सरपंच व उद्योजक अनिलशेठ काळुराम मालपोटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आज शुक्रवारी (दि.21) सायंकाळी चार वाजता हा कार्यक्रम होणार आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितीत कुलस्वामिनी महिला संघ, मावळच्या अध्यक्षा सारिका सुनील आण्णा शेळके या उपस्थित राहणार आहेत.
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करीत असलेल्या कार्यक्रमामुळे महिला जनजागृती, समाजप्रबोधन यासाठी भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा व त्यांच्या सन्मानाकरीता होम मिनिस्टर कार्यक्रमाचे आयोजन (MLA Sunil Shelke) करण्यात आल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.
मावळ तालुक्याचे आमदार सुनिल अण्णा शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या होम मिनिस्टर या खेळामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन आणि आकर्षक बक्षिसे जिंकून आपला आनंद द्विगुणित करावा, असे आवाहन कार्यक्रमाचे मुख्य आयोजक टाकवे बुद्रुकचे सरपंच भूषण असवले, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस मावळचे माजी अध्यक्ष शिवाजी चिधु असवले, माजी सरपंच व उद्योजक अनिलशेठ काळुराम मालपोटे यांनी केले आहे.
https://www.youtube.com/watch?v=h6H7ka-O-e0

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.