Vanwadi : वानवडीच्या ‘ओक्के भाई’चा ‘ओक्के कार्यक्रम’ पोलिसांनी ठोकल्या बेड्या

एमपीसी न्यूज : रेकॉर्डवरील गुन्हेगार ओक्के भाई व (Vanwadi)त्याच्या साथीदाराला वानवडी पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. ओक्के भाईकडून पोलिसांनी एक पिस्तूल व पाच जिवंत काडतूसे जप्त केली आहेत. ते पिस्तूल कशासाठी बाळगून फिरत होते, याची चौकशी केली जात आहे. 

ओक्केभाई उर्फ ओंमकार चंद्रशेखर कापरे (वय 27, रा. कोंढवा खुर्द) व मनिष उर्फ आकाश मारूती झांबरे (वय 27) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील गुन्ह्यांना पायबंद घालण्यासोबतच सराईतांची (Vanwadi) माहिती काढून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जात आहे. यादरम्यान, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपक लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाचे सहाय्यक निरीक्षक जयवंत जाधव व पथक हद्दीत गस्त घालत होते.

Facebook Crime : फेसबुकवर तरुणीला ‘हाय डिअर’ मेसेज, तरुणावर गुन्हा दाखल

यावेळी सराईत गुन्हेगार ओकेभाई पिस्तूल घेऊन फिरत असून, तो काळेपडळ येथील जीएसपीएम कॉलेज परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार पथकाने लागलीच यिथे धाव घेऊन सापळा रचला.

ओकेभाई व त्याचे साथीदार येत असताना दिसून आले. त्यांनी दोघांना पकडले. चौकशी केली असता ओकेभाईने कंबरेला लावलेले पिस्तुल मिळून आले. त्यांच्याकडे चौकशी सुरू असून, त्यांनी हे पिस्तूल कोणाकडून व कशासाठी आणले याबाबत चौकशी केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.