Facebook Crime : फेसबुकवर तरुणीला ‘हाय डिअर’ मेसेज, तरुणावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : फेसबुकवरच्या मॅसेंजरवरून तरुणीला (Facebook Crime) हाय डिअर सारखे मॅसेज पाठवून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात 27 वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यावरून फेसबुक धारक तरुणावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

या तरुणीला गेल्या काही दिवसांपासून मॅसेज येत होते. पण, तिने याकडे सुरूवातीला दुर्लक्ष केले. पण, सतत गुडमॉर्निंग, हाय बोल, बोल ना प्लिझ, हाय डिअर असे मॅसेज येऊ लागल्याने तिने शेवटी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यावरून (Facebook Crime) संबंधितावर गुन्हा नोंद केला. पुढील तपास पोलीस करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.