PMPML Bus : प्रवाशांना लुटण्याचा तयारीतील सराईत गुन्हेगारांची टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने दिवाळी सणानिमित्त पुणे शहरात खरेदी करण्यासाठी (PMPML Bus) आणि इतर कामासाठी पीएमपीएमएलने प्रवास करणाऱ्यांना लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीच्या मुस्क्या आवळल्या आहेत. गुन्हे शाखेच्या युनिट दोनने ही कारवाई केली. यामध्ये एका अल्पवयीन गुन्हेगाराचाही समावेश आहे. 
संतोष उर्फ मॅनेजर शरणाप्पा जाधव (वय- 45 रा. सर्वोदय कॉलोनी, मुंढवा सध्या रा मांजरी पुणे), अमित नाना चव्हाण (वय-25 रा. सर्वोदय कॉलोनी, मुंढवा सध्या रा मांजरी पुणे), विनोद बजरंग गायकवाड (वय-27 रा. सर्वोदय कॉलोनी, मुंढवा सध्या रा मांजरी पुणे) आणि पाहिजे आरोपी नामे सचिन उर्फ जयड्या अशोक गायकवाड वय 47 (रा. सर्वोदय कॉलोनी, मुंढवा) अशी आरोपींची नावे आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, सण आणि उत्सवाच्या काळात पी एम पी एम एल मध्ये होणाऱ्या चोरांना काल बंदी घालण्यासाठी वरिष्ठ पोलिसांनी सूचना दिला होत्या. त्या अनुषंगाने गुण शाखेचे पोलीस वेगवेगळ्या बस स्थानक परिसरात पेट्रोलिंग करत होते. यादरम्यान कॉन्स्टेबल मोहसीन शेख यांना प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असणाऱ्या एका टोळी विषयी माहिती मिळाली होती. याची माहिती त्यांनी वरिष्ठांना दिल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार पोलिसांनी स्वारगेट येथील पीएमटी बस स्टॉपच्या (PMPML Bus) पाठीमागे ब्रिज खाली थांबलेल्या चार जणांना झडप घालून ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्यांचे कब्जात 3 मोबाइल फोन, 1 कोयता, बांगडी/मंगळसूत्र कापणेकरिता लागणारे 2 कटर, 1 मिरची पूड, 2 सॅग असा एकूण 37,770/- ₹ किमतीचा मुद्देमाल आढळला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला असून चारही जणांना अटक केली आहे.
त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी बस प्रवाशांना लुटण्याच्या तयारीत असल्याची कबुली दिली.  त्यांच्याविरुद्ध स्वारगेट पोलीस ठाण्यात CR No 226/22 IPC 399, 402, आर्म ऍक्ट क 4(25) व महाराष्ट्र पोलीस ऍक्ट क 37(1) सह 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास Unit-2 कडून सुरू आहे.

तपासात महत्वाची माहिती समोर PMPML Bus 
टोळीप्रमुख संतोष उर्फ मॅनेजर शरणाप्पा जाधव हा मुंढवा पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. त्याच्यावर पुणे आयुक्तालयात विविध पो.स्टे. ला PMT तील चोरी, जबरी चोरी, वाहनचोरी, मारामारीचे 25 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून तो सध्या पुणे जिल्ह्यातून 2 वर्षकरिता तडीपार असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच तो विमानतळ पो.स्टे. कडील एका वाहनचोरीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे समजून आले आहे.
टोळी सदस्य आ.क्र. 2, 3 व 4 हे देखील मुंढवा पो.स्टे. रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्यांच्याविरुद्ध देखील आयुक्तालयात विविध पो.स्टे. ला PMT चोरी व शरीराविरुद्धचे अनेक गुन्हे दाखल आहेत
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली API वैशाली भोसले, API विशाल मोहिते, PSI राजेंद्र पाटोळे, PSI नितीन कांबळे, पो.अ. शंकर नेवसे, प्रमोद कोकणे, विनोद चव्हाण, साधना ताम्हाणे, उत्तम तारू, गजानन सोनुने, निखिल जाधव, गणेश थोरात, विजय पवार, मोहसीन शेख, उज्वल मोकाशी, संजय जाधव, रेश्मा उकिर्डे, राहुल राजापुरे व नागनाथ राख या टीमने केलेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.